*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – १०८ वे
अध्याय- १८ वा, कविता- ६ वी
___________________________
बाकी मंडळींनी हेतू मनीचा बोलला । जसा विठ्ठल दाविला ।
स्वामी तुम्ही बापुनाला । तसे घडवा दर्शन आम्हाला ।। १।।
गजानन महाराज म्हणाले । तुम्ही करा मन निर्मळ आपुले ।
असे जर झाले । घडवीन दर्शन तुम्हाला ।। २।।
याच सुमाराला । पंढरपूर क्षेत्राला । मरी आली मुक्कामाला । एकच कहर सगळीकडे ।। ३ ।।
डॉक्टरांनी आदेश दिला । तिथल्या पोलीसदला । नेऊन सोडावे वारकऱ्याला । चंद्रभागेच्या पार ।। ४ ।।
एक वारकरी वऱ्हाडचा । तो सापडला यात साचा ।कुणी ना केला विचार याचा । एकटा पडला बिचारा ।।५ ।।
सद्गुरू गजाननांची कृपा झाली । वारकऱ्याची व्याधी बरी झाली । मंडळी सारी आली । सुखरूप कुर्डुवाडीवर ।।६।।
एक कर्मठ ब्राहमण शेगावी आला । श्री गजानन दर्शनाला ।
नाही सोवळे-ओवळे, पाहून खट्टू झाला । उगाच आलो मनी म्हणाला। या ईथे।।७।।
रस्त्यात कुत्रे मृत झालेले । स्वामींनी त्यास उठविले । कुत्रे निघून गेले । ब्राह्मणास ,स्वामी सामर्थ्य कळले। क्षणात हो।।८।।
निरुत्तर तो झाला । स्वामींना शरण गेला । क्षमा करा स्वामी मला । चरण वंदून निघून गेला ।।९।।
स्वामींनी भला । भक्तांना संदेश दिला । भाव पाहिजे ठेवला।
श्री भगवंत चरणी ।।१० ।।
**********
इति अध्याय-१८ वा..
_____________
अध्याय १९ वा सुरू इथून पुढे..करी क्रमशः हे लेखन
कवी अरुणदास
___________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे-पुणे
____________________________
