You are currently viewing कोकण पर्यटनाला नवा हातभार!

कोकण पर्यटनाला नवा हातभार!

कोकण पर्यटनाला नवा हातभार!

खासदार नारायण राणे यांची पंतप्रधान मोदींकडे ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेअंतर्गत तिलारी धरण परिसराच्या विकासासाठी मागणी

नवी दिल्ली (प्रतिनिधी) :

कोकण आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार नारायण राणे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी धरण परिसराचा समावेश ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेत करण्याची मागणी केली. या प्रस्तावाला पंतप्रधान मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

तिलारी धरण परिसर हा जैवविविधता, समृद्ध निसर्ग आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. २०० एकरांहून अधिक शासकीय जमिनीवर हा परिसर पसरलेला असून, याठिकाणी स्वच्छता सुविधा, स्थानिक खाद्यसंस्कृतीला चालना देणारी रेस्टॉरंट्स, इको-फ्रेंडली निवास व्यवस्था, ट्रेकिंग, बोटिंग, सायकल ट्रेल्ससारख्या सुविधा उभारण्याचा प्रस्ताव आहे.

खासदार राणे यांनी पंतप्रधानांच्या समोर मुंबा देवी मंदिराच्या विकासाचेही निवेदन सादर केले. ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत मंदिर परिसरात भक्तांसाठी मूलभूत व आधुनिक सुविधा निर्माण करून ते जागतिक पर्यटन नकाशावर नेण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत लवकरच कार्यवाहीचे आश्वासन दिले असून, यामुळे कोकण व मुंबईच्या पर्यटन विकासाला बळ मिळेल, स्थानिक रोजगार निर्मितीस चालना मिळेल आणि पर्यावरणपूरक पर्यटनासाठी नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा