You are currently viewing फोंडाघाट पावणादेवी रस्ता बंद; लोकांची ग्रामपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी

फोंडाघाट पावणादेवी रस्ता बंद; लोकांची ग्रामपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी

फोंडाघाट पावणादेवी रस्ता बंद; लोकांची ग्रामपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी

फोंडाघाट
फोंडाघाट येथील पावणादेवी परिसरात मोठ्या वडाचे झाड रस्त्यावर कोसळल्याने गावात जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. यामुळे गेल्या २४ तासांपासून वाहतूक ठप्प झाली असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून होत असून, ग्रामपंचायतीने तत्काळ लक्ष घालावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. पावणादेवी परिसरातील नागरिकांनी या भागातील कथित पुढाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन रस्ता लवकरात लवकर खुला करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित नाडकर्णी यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, स्थानिक नागरिकांनी आपल्याला मतदान करत विश्वास दाखवलेला असताना त्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, ही रास्त अपेक्षा आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा