You are currently viewing नागपंचमी

नागपंचमी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”नागपंचमी”*

 

भारताचे असती नागराजे ख्यात प्राचीन

पराक्रमी नागवंशीय राजे कर्तृत्ववान।।धृ।।

 

सर्वात मोठा होता नागराज अनंत

जम्मू काश्मीरांतील अनंत नाग प्रसिद्ध

राजाच्या कर्तुत्वाची साक्ष देते पटवून।।1।।

 

नागराजा वासुकी उत्तर प्रदेश नृप

नागराजा तक्षक होता जगप्रसिद्ध

तक्षशिला विश्वविद्यापीठ केले स्थापन।।2।।

 

नागराजा कर्कोटक रावी प्रदेश नृप

भंडारा प्रांत प्रमुख नागराजा ऐरावत

पाचही राज्यांच्या सीमा एकमेका लगत।।3।।

 

पुजा होते पाच नागराजांच्या स्मृती प्रित्यर्थ

प्रतिवर्षी साजरी होत नागपंचमी तिथ

प्रजा नागराजांचे सदैव करिते स्मरण।।4।।

 

नागोबाचे शय्येवर विराजले नारायण

सात फडा उभारून सांभाळती धरा तोलून

दूध लाह्या वाहू त्याला करू त्याचे पूजनII5II

 

कृषीवलांचा मित्र आहे भूमी रक्षक नाग

शिवाच्या गळ्यांत नागाला मानाचे स्थान

गजाननाचे कटीवर राहे विलसून।।6।।

 

शेष पद्म कंबल अश्वतर धृतराष्ट्र

शंखपाल कालीय तक्षक पिंगलादी नाग

बारा महिन्यांची प्रतीके करावे पूजनII7II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा