You are currently viewing मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील माजी कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी मिलिंद गुरव यांचे अल्प आजाराने निधन

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील माजी कर्तव्यदक्ष महसूल अधिकारी मिलिंद गुरव यांचे अल्प आजाराने निधन

ठाणे – मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्तव्यदक्ष माजी महसूल अधिकारी श्री. मिलिंद गजानन गुरव यांनी कासारवडवली येथील खासगी रुग्णालयात दि. २८ जुलै सकाळी आठच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते मुत्युसमयी ६२ वर्षांचे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील श्री. मिलिंद गुरव त्यापूर्वी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विभागात अठरा वर्षे त्यांनी प्रदिर्घ कामकाज पाहिले होते. त्यांच्या सोबत निवडणूक विभागात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ५२ पत्ते म्हणून ओळखले जात होते.तसेच त्यांनी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात एक अभ्यासू वृत्ती कार्यरत असणारा अधिकारी अशी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अल्प आजाराने निधन झाल्याने आजी, माजी अधिकाऱ्यांनी वर्गाने अंत्य यात्रेत सहभागी होत हळहळ व्यक्त केली आहे. आणि त्यांच्या प्रती सहवेदना वाहिल्या आहेत. श्री. गुरव यांच्या पश्चात पत्नी अनुराधा, मुलगी आर्किटेक्ट साक्षी , मुलगा स्वप्निल, दोन भाऊ, एक विवाहित बहीण,सनूबाई असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा