वृत्तसंस्था:
नवी दिल्ली : शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. गायिका रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलीफासारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे. सचिनच्या ट्वीटनंतर काल अनेक रवी शास्त्रीपासून ते शिखर धवनपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी यावर एकापाठोपाठ ट्वीट केले. मात्र क्रिकेटपटूंच्या या ट्वीटरवर कॉंग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केला आहे.
कार्ती चिंदबरम म्हणाले, प्रिय बीसीसीआय, कृपया क्रिकेटपटूंना जबरदस्तीने ट्वीट करायला सांगू नका, हे अत्यंच चूकीचे आहे.
समस्येवर लवकरच तोडगा निघेल : विराट कोहली
कर्णधार विराट कोहली म्हणाला, या कठीण प्रसंगी आपण एकजूटीने राहण्याची गरज आहे. शेतकरी आपल्या देशाचा महत्त्वपूर्ण घटक असून या समस्येवर लवकरच तोडगा निघेल. तोपर्यंत आपण शांतता राखणे गरजेचे आहे.
शेतकरी आंदोनलनाला ग्लोबल सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत असताना अमेरिकेने आता यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे. अमेरिकेने असं म्हटलं आहे की, जगातील बाजारावर नव्या कृषी कयद्यामुळे प्रभाव वाढेल. अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. शेती कायद्यास शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात. अमेरिकेने म्हटलं की भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्यांचे स्वागत आहे.