You are currently viewing संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद सफाई कामगारांना रेनकोट वाटप..

संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद सफाई कामगारांना रेनकोट वाटप..

सावंतवाडी :

भाजप नेते संदीप गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतील सफाई कामगारांना रेनकोट वाटप करण्यात आले. पावसाळ्यात काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला असून गावडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिपक म्हापसेकर, भाई राणे उपस्थित होते. सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी संदीप गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा