*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
श्रावणाची ही कथाच…
कसा घेऊन आलाय झारी
छत्र पावसाचे पहा पसारी
श्रावणाची हो कथाच न्यारी…
ऊन कोवळे पडते छान
मस्त खुशित हासते रान
चराचर हा आनंद निधान
वेली झाडे हात पसरती फुलांची कारागिरी
श्रावणाची हो कथाच…
मोर नाचती थुईथुई
ढाराढूर ही जमीन होई
येई पिकांना रानी उधाण
पक्षी गाती आभाळी गाणं पिकं ही धरती उभारी
श्रावणाची ही कथाच…
इंद्रधनूही कडे उभारी
निळे डोंगर कडेपठारी
न्हाती सचैल साधुसंत
मंदिरातूनी घंटा मंत्र भजने स्तोत्रे सारी
श्रावणाची ही कथाच…
येतो आनंद देऊन जातो
तृप्त वसुंधरेला करतो
पल्लवित मनी आशा होती
बरकत देईल आता शेती उभा राहतो शेतकरी
श्रावणाची ही कथाच…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
