१६ वर्षीय मनस्वी फाळे हिचे सुवर्ण यश; फोंडाघाटमध्ये भव्य मिरवणूक आणि सत्कार सोहळा
रेंज रायफल प्रकारात अमरावती येथे सुवर्ण पदक; सर्वसामान्य कुटुंबातील मुलीचे उंच भरारीत यश
फोंडाघाट:
अमरावती येथे पार पडलेल्या रेंज रायफल प्रकाराच्या स्पर्धेत मनस्वी फाळे हिने सुवर्ण पदक पटकावले असून तिचा गावामध्ये मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. फोंडाघाट एस.टी. स्टॅंड ते हायस्कूल या दरम्यान तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि नागरी सत्कारही करण्यात आला.
मनस्वी ही सर्वसामान्य कुटुंबातील असून तिचे वडील भाजी विक्रेते आणि आई गृहिणी आहेत. N.C.C. कॅडेट म्हणून तिला सौ. भोगले मॅडम व श्री. लाड सर यांचे मार्गदर्शन लाभले. सुरुवातीला शाळेच्या टेरेसवर सराव सुरू झाला आणि नंतर आंबोली सैनिक शाळेतही ती प्रशिक्षणासाठी सहभागी झाली.
तिच्या यशानंतर डाॅ. आपटे, शिवसेना गट, आणि सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी मनस्वीचे अभिनंदन केले. नाडकर्णी यांनी तिला १६ वर्षे पूर्ण केल्याबद्दल १६१६ रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविले. या वेळी संस्थेचे चेअरमन श्री. राजू पटेल, बबन शेट पवार, आण्णा लिंग्रस, खजिनदार सचिन तायशेटे, तसेच सर्व सदस्य आणि सरपंच आग्रे मॅडम, शिवसेना गटनेते संजयजी आग्रे उपस्थित होते.
या यशामुळे फोंडाघाट गावात आनंदाचे वातावरण असून संध्याकाळी पोकळे पेट्रोल पंप ते दत्तमंदिर, आणि पुढे हवेलीनगर येथील तिच्या घरापर्यंत दुसरी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या निमित्ताने अजित नाडकर्णी यांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत.
मनस्वीच्या यशामुळे तिचे भवितव्य उज्ज्वल असून ती भविष्यात आणखी मोठे यश मिळवेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला
