You are currently viewing सांब सदाशिव भोळा

सांब सदाशिव भोळा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सांब सदाशिव भोळा*

 

विश्व कल्याणक

सांब सदाशिव भोळा

देव आगळा

विरागी….

 

कैलासी निवास

उमेचा आहे पती

रुद्रांचा अधिपती

श्रीशंकर….

 

कंठी रुद्रमाळा

सर्वांगी वेष्टित फणीवर

रुद्राक्ष मनोहर

धारण..‌‌..

 

सदा तपस्वी

एकांती असे साधना

विरक्त राणा

कैलासीचा…

 

भोळा सांब

संन्यस्त अभोगी विरक्त

भोगातून अलिप्त

महायोगी….

 

भक्तीने पावतो

कृपार्णव दयार्णव किती

त्रिलोकी महती

शिवशंभो…!!

००००००००००००००

अरुणा दुद्दलवार @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा