You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प-३३ वे

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प-३३ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

_____________________

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प-३३ वे

श्री स्वामी भ्रमणगाथा..(अंबाजोगाई-महाराष्ट्र)

___________________________

 

गुराखी-कन्या भयभीत झाली । आपला शिरच्छेद होणार,

खात्री तिची झाली । ती मारेकऱ्यांना म्हणाली । माझ्या संन्यासी- आजोबांचा निरोप घेऊ द्या ।। १ ।।

 

नातीचे बोलणे स्वामी आजोबांनी ऐकले । तुझा वध होणे शक्य नाही । भिऊ नकोस मी पाठीशी आहे । त्यांचे हे शब्द मारेकऱ्यांनीही ऐकले ।। २ ।।

 

नृसिंह-उग्र रुपात स्वामींना पाहिले । मारेकरी ते घाबरले ।

गावात जाण्या निघाले । सावकाराला घेऊन येण्या ।।३।।

 

तिथे आलेल्या सावकाराला। आणि सोबतच्या मंडळीला।

चमत्कार विलक्षण दिसला। मुली ऐवजी मुलगा दिसला ।।४।।

 

आपल्या भक्तांचा जीव वाचविला। मुलीचा मुलगा झाला।

सर्वांना प्रत्यय आला । ब्रह्मांडनायकाच्या सामर्थ्याचा ।।५।।

 

स्वामींच्या कृपेने पुढचे कार्य पार पडले । वरास स्वामी म्हणाले । शास्त्रानुसार तू पाहिजे वागले । मग भेटीस यावेस तू प्रज्ञापुरी ।। ६ ।।

 

स्वामी अंतर्धान पावले । जन जमलेले । गावात परतले ।

मनात आठवीती स्वामींना ।।६ ।।

*********************************

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास ‘- अरुण वि.देशपांडे-पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा