You are currently viewing सिंधुदुर्गचा सुपुत्र ठरतोय युरोप शिक्षणाचा दूत

सिंधुदुर्गचा सुपुत्र ठरतोय युरोप शिक्षणाचा दूत

सिंधुदुर्गचा सुपुत्र ठरतोय युरोप शिक्षणाचा दूत;

राहुल नाईक यांच्या ‘एज्युब्रॉड’ संस्थेमार्फत कमी फीमध्ये जर्मनीसह युरोपमध्ये उच्च शिक्षणाची संधी

कुडाळ
परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कोकण आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील सुपुत्र, राहुल नाईक यांनी स्थापन केलेल्या ‘Edubroad Education and Career Guidance Centre – बर्लिन’ या संस्थेमार्फत जर्मनीसह युरोपातील विविध देशांमध्ये अत्यल्प शुल्कात उच्च शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

राहुल नाईक यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. ते म्हणाले की, जर्मनीसारख्या युरोपियन देशांमध्ये शासनाच्या विविध योजना व स्कॉलरशिप्सच्या माध्यमातून कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण घेता येते. परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची योग्य तयारी गरजेची आहे. एज्युब्रॉड संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना योग्य युनिव्हर्सिटी निवड, कोर्स सल्ला, व्हिसा प्रक्रिया, निवास व्यवस्था, भाषा प्रशिक्षण यांसारख्या सर्व बाबतीत मार्गदर्शन दिले जाते.

राहुल नाईक स्वतः गेल्या १५ वर्षांपासून बर्लिन येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी जर्मनीतील ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पूर्ण करून तेथेच नोकरी सुरू केली. यावेळी त्यांना स्वतःच्या अनुभवातून परदेशातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणवल्या. त्यावर उपाय म्हणून त्यांनी ही संस्था सुरू केली.

राहुल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी युरोपात शिक्षण व नोकरीच्या संधी मिळवल्या आहेत. ही संस्था केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना युरोपातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठीही मदत करते. यामध्ये करिअर मार्गदर्शन, आर्थिक नियोजन, अर्ज प्रक्रिया, आणि तेथील जीवनशैलीशी जुळवून घेण्याबाबतही संस्थेकडून व्यक्तिगत मार्गदर्शन केले जाते.

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांप्रमाणे संधी मिळाव्यात या हेतूने कुडाळ आणि कोल्हापूर येथे शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. आज जिल्ह्यातील १५ हून अधिक विद्यार्थी जर्मनीत उच्च शिक्षण घेत आहेत. संस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, २४x७ सहकार्य आणि मार्गदर्शन.

विशेष म्हणजे, परदेशात शिकताना स्थानिक भाषा अडथळा ठरू नये म्हणून ऑनलाइन जर्मन आणि फ्रेंच भाषा प्रशिक्षण वर्ग देखील सुरू करण्यात आले आहेत. हे प्रशिक्षण राहुल यांची पत्नी श्रीमती श्रुती नाईक चालवतात.

शिक्षण, सांस्कृतिक समृद्धी आणि करिअर संधींसाठी परदेशातील शिक्षण हे आजच्या युगात एक परिवर्तनकारी अनुभव ठरत आहे. जर्मनी, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांमध्ये शिक्षण घेणे आता फक्त महानगरांतील नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीही शक्य झाले आहे आणि या दिशेने सिंधुदुर्गचा राहुल नाईक आपल्या संस्थेमार्फत दीपस्तंभ ठरत आहे.

अंतिमतः, श्री. नाईक यांनी यावेळी उपस्थितांना आवाहन केले की, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधींसाठी पुढे यावे व भविष्यासाठी मोठी पावले उचलावीत.

आपल्या स्वप्नांना आंतरराष्ट्रीय पंख देण्यासाठी, ‘एज्युब्रॉड’ आहे तुमच्या पाठीशी!

 

प्रतिक्रिया व्यक्त करा