बांदा:
महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठेच्या वैकुंठभाई मेहता पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मिळाल्याने बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा डेगवे येथील स्थापेश्वर विकास सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. ओरोस येथे झालेल्या या सत्कार सोहळ्यात सोसायटीचे चेअरमन प्रवीण देसाई आणि सरपंच राजन देसाई यांनी मनीष दळवी यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी माजी सरपंच मधु देसाई आणि ग्रामपंचायत सदस्य राजेश देसाई आदी उपस्थित होते.

