*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावण आला… श्रावण आला…*
श्रावण आला श्रावण आला
बांधून गेला तो हिरवा शेला…
नदी नि नाले पूरच पूर
श्रावण ला व तो हुरहुर…
साजण आला बांधतो झुला
सयांनी केला हो गलबला
आंब्यावर तो कोकिळ बोले
काळीज बोले काळीज हाले…
मनाचे पांखरू फडफड करे
सजणावाचून सजणी झुरे
क्षणात जाई रानात मन
करतो बाई काय साजण…
ये ना ये राजा घुंगुरगाडी
नेसेन तुझ्या साठी पैठणी
माळला बघ गजरा छान
तुझ्या सवे माझे सुटू दे भान..
कडकड कडकड गडगड गडगड
तुझी ही मेघनाद पालखी
चातक होऊन वाट पाहते
साजण तुझी तुझी ही सखी..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(9763605642)
