You are currently viewing कृषीकन्यांनी सर्व्हेतून शोधल्या शिवारातील उणीवा

कृषीकन्यांनी सर्व्हेतून शोधल्या शिवारातील उणीवा

*कृषीकन्यांनी सर्व्हेतून शोधल्या शिवारातील उणीवा*

*उत्पन्न वाढीसाठी वाढीसाठी ज्ञानाचा दिला बुस्टर डोस*

फोंडाघाट

*कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील
कृषी विभागाच्या अंतिम वर्षाच्या कृषीकन्यांकडून ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव व कार्यक्रम अंतर्गत वाघेरीत सर्वे करून गावातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेतल्या तसेच सर्वोपरी उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न केला .
तसेच उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी नियोजन बांधणी कशी केली पाहिजे ..कोणती खत वापरली पाहिजेत याबद्दल माहिती दिली.
यामध्ये प्रामुख्याने उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न, कच्चे रस्ते, लाईट ची समस्या , वन्यजीवांमुळे तसेच पावसाळ्यात अतिवृष्टी सदृष्य पावसाने होणारे पिकाचे नुकसान इत्यादी समस्यांचा आढळून आल्या .
या सव्हेसाठी सरपंच अनुजा राणे, ग्रामसेवक अयाज सर तसेच गावातील शेतकऱ्यांचे सहकार्य लाभले
कृषी कन्या कल्याणी पाटील, प्रांजल भोसले, समृद्धी कुराडे, निकिता कावणेकर, प्रिया नागरगोजे, साईश्वरी निकम, नम्रता महामुनी, प्रज्ञा देशमुख, प्रगती जाधव, लावण्या झोरे, ज्योतिका कंदले या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थीना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संते, समन्वयक बगाडे, श्री. चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले*सर्व कृषी कन्यांचे सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी यांनी केले अभिनंदन आणि भावी प्रगतीसाठी दिल्या शुभेच्छा.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*✒️✒️✒️✒️✒️

प्रतिक्रिया व्यक्त करा