देवगड :
देवगड तालुका आत्म्याच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भूषण बोडस यांनी पालकमंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेत आभार मानले. देवगड तालुका शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी भूषण बोडस यांची अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, मंडल प्रभारी डॉ अमोल तेली, देवगड तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, माजी सभापती रवी पाळेकर आदी उपस्थित होते.
