“नको नशा, हवी दिशा” अभियानांतर्गत वैभववाडी महाविद्यालयात पहिले व्याख्यान संपन्न.
ॲड. राजीव बिले यांचे मार्गदर्शन
वैभववाडी,
रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या “नको नशा, हवी दिशा” या विशेष जनजागृती अभियानांतर्गत, आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “तरुणांमधील व्यसनाधीनता – एक समस्या” या विषयावर प्रभावी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. राजीव बिले यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब वैभववाडीचे अध्यक्ष रोटे. सचिन रावराणे होते. हे व्याख्यान त्यांच्या संकल्पनेतील “नको नशा, हवी दिशा” या अभियानातील पहिला टप्पा होता. कार्यक्रमास रोटरी क्लब वैभववाडीचे मार्गदर्शक व असिस्टंट गव्हर्नर रोटे. डॉ. प्रशांत कोलते हेही उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून नवीन रोट्रॅक्ट क्लब स्थापनेची गरज स्पष्ट करताना, रोटरी क्लबद्वारे तरुणांमध्ये सामाजिक जाणीवा जागृत होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटे. प्रशांत गुळेकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व रोटरी क्लब वैभववाडीचे सचिव डॉ. नामदेव गवळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमास रोटे. विद्याधर सावंत, सिंधुदुर्ग सेंट्रल क्लबचे खजिनदार रोटे. प्रथमेश सावंत, प्रा.अजित कानशिडे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

