You are currently viewing फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम मॉन्टेसरीच्या बैठकीत माजी विद्यार्थ्यांचे उदंड योगदान

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम मॉन्टेसरीच्या बैठकीत माजी विद्यार्थ्यांचे उदंड योगदान

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियम मॉन्टेसरीच्या बैठकीत माजी विद्यार्थ्यांचे उदंड योगदान;

सोमवारी मनस्या फालेचा भव्य सत्कार

फोंडाघाट
आज फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियम मॉन्टेसरी शाखेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. बैठकीस चेअरमन श्री. राजू पटेल, खजिनदार सचिन तायशेटे, रंजन नेरुरकर, सुभाष सावंत, रमेश भोगटे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

मॉन्टेसरीला आवश्यक असलेल्या सुविधांची पूर्तता करण्यासाठी १९७९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतला. या बॅचतील उमेश रेवडेकर, भास्कर सापळे, वामन पारकर, आणि कंडक्टर लाड यांनी लहान मुलांसाठी बेंचेस व पुस्तके ठेवण्याचे कपाट भेट दिले. तसेच माजी खजिनदार श्री. अजित नाडकर्णी यांनी १२ नीलकमल प्लास्टिक खुर्च्यांचे योगदान दिले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली आणि त्यानंतर सर्व देणगीदारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. अजित नाडकर्णी यांनी, “शाळेला आणखी काही वस्तुरूपात मदत हवी असल्यास नक्की कळवा, शक्य तेवढी मदत करीन,” असे आश्वासन दिले. याशिवाय, चिराखाण येथील व्यावसायिक श्री. लिंग्रस यांनी ₹१००००/- रुपयांचा धनादेश शाळेस दिला.

बैठकीच्या समारोपात सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले आणि कार्यक्रमाचे समाधानपूर्वक समापन करण्यात आले.

दरम्यान, अमरावती येथे ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या मनस्या फाले हिचा सोमवारी फोंडाघाट येथे भव्य सत्कार सोहळा व मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. तिच्या या राष्ट्रीय यशाबद्दल अजित नाडकर्णी, ‘लोक आवाज शुभांजित सृष्टी’ संस्थेमार्फत सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन विशेष सत्कार करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

फोंडाघाट परिसरात या दोन्ही घटनांमुळे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा