कुडाळ :
कुडाळ येथील केळबाई मंदिर जवळ राहणारे संतोष परशुराम वारंग (वय वर्ष ५०) हे २० जुलै पासून बेपत्ता असल्याची खबर त्यांची पत्नी संजना वारंग यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
श्री वारंग हे मुंबई येथे राहणारे आहेत. सध्या ते केळबाई मंदिर जवळ भाड्याने राहतात. आपण मुंबई येथे जाऊन येतो असे सांगून ते घरातून बाहेर पडले परंतु अद्याप पर्यंत आले नसल्याची खबर पत्नीने पोलिसांना दिली आहे. ते वर्णाने सावळे, सड पातळ, अंगात चॉकलेटी टी-शर्ट, ग्रे कलरची पॅन्ट असून त्यांची उंची पाच फूट तीन इंच एवढी आहे. अधिक तपास श्री भोई करत आहेत.

