You are currently viewing मिशन आयएएस तर्फे खानदेशातील कलेक्टर झालेल्या मुलांचा सत्कार

मिशन आयएएस तर्फे खानदेशातील कलेक्टर झालेल्या मुलांचा सत्कार

इडीचे मा. उपसंचालक पाहुणे

 

मिशन आयएएस तर्फे खानदेशातील केंद्रीय लोकसेवा आयोगाची व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व इ 10 वी, 12 वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम येत्या शनिवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 9.30 वा. चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे.

 

या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खानदेशमध्ये सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले माजी अप्पर आयकर आयुक्त व ई डी चे माजी उपसंचालक मा डॉ उज्ज्वल कुमार चव्हाण हे राहणार असून या कार्यक्रमाला मुंबईचे सुप्रसिद्ध उद्योगपती श्री प्रकाश बाविस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत.

याशिवाय या कार्यक्रमाला सहसंचालक श्री कपिल पवार, उपायुक्त श्री राकेश पाटील, मिशन आय ए एस चे अमरावतीचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे, श्री प्रशांत पाटील तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रवीण दात्रे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात या वर्षी यु.पी.एस.सी. झालेले कु. मोहिनी सूर्यवंशी IPS, (धामणगाव) , श्रीतेज पटेल IRS (धुळे) व श्री योगेश पाटील IRMS (आमोदा, यावल) तसेच मुंबईचे सहाय्यक अभियंता श्री श्रीकांत पायगव्हाणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्याचबरोबर या वर्षी एमपीएससी पास झालेले श्री उदय खैरनार, महेश देशमुख, सुदर्शन चव्हाण, संदेश पवार , तुषार निकम, अक्षय पाटील , श्रीमती सपना वाघ , श्रीमती ज्योती राठोड यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यास पद्धती, रणनीती आणि प्रेरणा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या वर्षी युपीएससी व एमपीएससी पास झालेले अधिकारी स्वतः त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.

 

धामणगाव व परिसरातील 10 ते 12 गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून मिशन IAS च्या माध्यमातून 2018 पासून सलगपणे असे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मिशन आयएएस चे विभागीय संचालक श्री प्रवीण पवार (चाळीसगाव) यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम आयोजित होत असून उत्कर्ष खानदेशी अधिकारी मित्र मंडळ, आरंभ अधिकारी ग्रुप चाळीसगाव व मिशन IAS जळगाव तसेच भुसावळचे मिशन आय.ए.एस.चे संचालक श्री मनोहर जाधवानी आणि राजपत्रीत अधिकारी श्री अभिषेक कासोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. पालक समिती धामणगाव , गिरणा परिसर सत्कार सोहळा समिती व सूर्यवंशी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचा लाभ होत असून या भागातील विद्यार्थी दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी होत आहेत.

 

सर्व पालक, विद्यार्थी व स्पर्धा परीक्षा अभ्यासकांनी या प्रेरणादायी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गिरणा परिसर सत्कार सोहळा समिती सदस्य व पालक समिती सदस्य व संयोजकांनी केली आहे.

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा