*मास्तरच्या लेखणीतून एक दुःखद सत्य :😢👍*
*विद्यालयाच्या जागेपायी*
*कुणीच इथं भांडलं नाही*
*अन्..देवालयाच्या जागेसाठी*
*रक्त इथं कमी पडलं नाही..*
*माझाच देव मोठा म्हणण्यात*
*रक्ताच्या नद्या वाहील्या*
*ज्ञानगंगा कोरडी पडत*
*ओसाड शाळा झाल्या…*
*शाळा अजुनही तशीच*
*पडक्या,तुटक्या भिंतीची*
*गरीब माझ्या देशामधी*
*उभी मंदिरं सोन्याची…*
*धर्मासाठी , पैशांसाठी अनेक आंदोलने पाहिली*,
*पण शिक्षणाच्या भल्यासाठी कुणी मोर्चा काढला नाही*,
*शाळे मधली दानपेटी*
*भरलेली कधी पाहिली नाही*
*अन् मंदिराची दानपेटी*
*रिकामी कधी राहिली नाही…*
*शाळेतला पालक मेळावा*
*पालकांवाचून राहून गेला*
*देवालयात चेंगराचेंगरीत*
*माणुस मात्र तुडवून मेला…*
*विद्येचं ज्ञान देऊन*
*गुरूजी गरीबच राहीला*
*अन्’अंधभक्तांचं’ दान घेऊन*
*पुजारी धनवान झाला…*
*खरंतर धर्म नावाचं पुस्तक*
*शाळेत कधीच उघडत नाही*
*अन् धर्माच्या नावाशिवाय*
*देशात पानही हालल नाही…*
*✍मास्तर…*
*संग्रह अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*
