कर्लाचाव्हाळ येथे युवकाची गळफास घेत आत्महत्या
मालवण
मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ येथील जगन्नाथ धोंडी सडवेलकर (वय- २५) या युवकाने राहत्या घराच्या मागील बाजूस गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने अनुप हिंदळेकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. याबाबत अधिक तपास सुरू आहे. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
