मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. 5 वी व 8 वी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामार्फत इयत्ता 5 वी (प्राथमिक स्तर) व इयत्ता 8 वी (उच्च प्राथमिक स्तर) परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज प्रक्रिया 31 जुलै 2025 (रात्री 10:59 वाजेपर्यंत) उपलब्ध राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव प्रमोद गोफणे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी अर्ज भरावेत. अर्ज भरताना आवश्यक सूचना काळजीपूर्वक वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्याचा व कागदपत्रे स्विकारण्याचा तपशील पुढीलप्रमाणे:- ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्याची मुदत : 17 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करण्याची कालमर्यादा : 04 ऑगस्ट 2025 ते 15 ऑगस्ट 2025 पर्यंत. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करण्याची अंतिम तारीख : 23 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे.
