जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी परदेश अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात भाग घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५ शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ३० जुलै पर्यंत संबंधित कृषि अधिकरी कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
यामध्ये महिला शेतकरी -१, केंद्र राज्य कृषि पुरस्कार प्राप्त पिक स्पर्धा विजेते शेतकरी -१ व इतर शेतकरी -३ असे एकूण ५ शेकऱ्याचा समावेश असले इच्छकांनी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत.
दौऱ्यासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे असावे, तो स्वत:च्या नावे जमीनधारक असावा. उत्पन्नाचे प्रमुख साधन शेतीचे असावे, तसेच चालू सहा महिन्यांचा ७/१२ उतारा, आधार कार्ड, रेशनकार्ड डॉक्टरकडून दिलेले तंदुरुस्ती प्रमाणपत्र व वैध पासपोर्टची प्रत अर्जासोबत जोडावी. यापूर्वी शासनाच्या मदतीने दौरा केलेला नसावा. अर्ज व अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
