ठाकरे गटाच्या सामाजिक उपक्रमातून रिक्षाचालकांचा सन्मान; ६८ चालकांना आरोग्य किटचे वाटप
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
सावंतवाडी
प्रवाशांच्या दैनंदिन सेवेत अहोरात्र तत्पर असलेल्या तीन आसनी रिक्षाचालकांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने आरोग्य किटचे वाटप करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्थानकाजवळ सुमारे ६८ रिक्षा चालक-मालकांना हे किट प्रदान करण्यात आले.
या उपक्रमात शिवसेनेचे नेते चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, अशोक धुरी, संदीप पांढरे, विनोद काजरेकर, बंड्या घोगळे, सुनील गावडे, फिलिप्स रोड्रिक्स, गुणाजी गावडे, नम्रता झारापकर, बाबू गावडे, प्रशांत बुगडे, शरद जाधव, नेमळे उपसरपंच राऊळ, मंथन गवस, रोहन मल्हार, संदीप भाईत, संजय धुरी, सचिन मुळीक यांच्यासह रिक्षा संघटना व सहा आसनी रिक्षा संघटनेचे चालक-मालक, शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात रिक्षाचालकांना राऊळ यांच्या हस्ते आरोग्य किट वितरित करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, “रिक्षाचालक हे शहराच्या हालचालीचा अविभाज्य भाग आहेत. तुम्ही कधीही हाक द्या, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”
या उपक्रमामुळे रिक्षाचालकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, अशा सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
