You are currently viewing विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससी परीक्षेचे व्यासपीठ तयार करून देणे गरजेचे – जयप्रकाश परब

विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससी परीक्षेचे व्यासपीठ तयार करून देणे गरजेचे – जयप्रकाश परब

कणकवली :

सध्याच्या युगात कोणतेही ध्येय गाठण्यासाठी घरी बसून चालणार नाही. यासाठी स्पर्धेच्या युगात कठोर मेहनत केली पाहीजे.विद्यार्थ्यांना युपीएससी व एमपीएससी परीक्षेचे व्यासपीठ तयार करून देणे गरजेचे आहे. कासार्डेत स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात पुढाकार घेतला पाहिजे यासाठी सर्वतोपरी आपण सहकार्य करण्याची आपली तयारी आहे असे प्रतिपादन कासार्डे गावचे सुपुत्र व सिंधुदुर्ग जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी केले. ते कासार्डे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाल्यानतंर आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळयात ग्रामपंचायत कासार्डेच्या सभागृहात बोलत होते.

यावेळी माजी जि. प. सदस्य संजय देसाई, माजी उपसभापती प्रकाश पारकर,सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, माजी सरपंच संतोष पारकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीरंग पाताडे , ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते, तलाठी जाधव, सोसायटी चेअरमन दिपक सावंत, उद्योजक प्रणिल शेटये, ग्रामपंचायत सदस्य विजय राणे, सहदेव खाडये,बाळा जोशी ,प्रकाश तिर्लोटकर,पपी पाताडे,शरद शेलार, सत्यवान आयरे, प्रमोद शेटये, दत्तगुरु परब, आरेकर भाऊ, डॉ जांभिलकर, मोहन परब याच्या कासार्डे गावातील सर्व पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

पुढे बोलताना परब म्हणाले, ज्या मुलांना शैक्षणिक अभ्यासाची आवड आहे. त्याना स्पर्धा परीक्षेचे धडे लहान पानापासून दिले पाहिजेत.यातूनच अनेकजण उच्च पदावर पोहचतील. आज मी या पदावर पोहचलो या पदाचा उपयोग कासार्डेसह जिल्ह्य़ाच्या विकासात्मक कामासाठी करणार असल्याचे सांगून आज गावच्या वतीने करण्यात आलेला सत्कार माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल.

यावेळी प्रकाश तिर्लोटकर,प्रकाश पारकर,संजय देसाई,निशा नकाशे , जान्हवी परब यानी मनोगत व्यक्त केले.तत्पूर्वी श्री जयप्रकाश परब यांचा कासार्डे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ याच्य् वतीने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व जान्हवी परब यांचाही सरपंच निशा नकाशे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन कोलते व सुत्रसंचालन अमोल जमदाडे यानी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा