You are currently viewing दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 

दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

दिपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

दोडामार्ग (प्रतिनिधी) —

मा. दिपकभाई केसरकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष गुणगौरव सोहळा रविवार, दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दोडामार्ग येथील महालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत 1, 2 व 3 क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास मा. दिपकभाई केसरकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्यासोबत जिल्हा प्रमुख संजू परब, सचिन वालावलकर, अशोक दळवी, ऑड. नीता सावंत, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर, शैलेश दळवी तसेच दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या विशेष कार्यक्रमासाठी सर्वांनी आपली उपस्थिती नोंदवावी, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा