You are currently viewing मंजुळ पावरी

मंजुळ पावरी

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मंजुळ पावरी*

*************

अंतरात बरसात भावनांची

जणू रिमझीम शब्दफुलांची

 

चराचरी प्रीत चिंबचिंबलेली

साक्ष विलोभनिय प्रतिभेची

 

क्षणाक्षणांना वेचिता वेचीता

बहरली डहाळी सत्यसुखाची

 

डोहात प्रीतीच्या तो सावळा

धून घुमते मंजुळ ती पावरीची

 

आसमंती सप्तरंगली रंगावली

लोचनी प्रचिती पावन सुखाची

***********************

*©️वि. ग .सातपुते.( भावकवी )*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा