अमरावती :
दक्षिण कोरियातील सेऊल येथे नुकत्याच झालेल्या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात मिशन आयएएसच्या आजीव सदस्या कु. शिफा कासार हिला बहुमान प्राप्त झाला आहे.
हे अधिवेशन दर दोन वर्षांनंतर युनोस्कोच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात येते. पुढील वर्षी हेच संमेलन इटली देशातील रोम येथे होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या अधिवेशनाला जाणारी कु. शिफा कासार ही एकमेव राजकीय विश्लेषक महिला प्रतिनिधी म्हणून सहभागी झाली होती.
अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यामध्ये युनेस्कोचा मोठा सहभाग असतो. या परिषदेला संयुक्त राष्ट्राचे मा. अध्यक्ष श्री बन की मून हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन दक्षिण कोरियाचे अध्यक्षांच्या हस्ते झाले .ही परिषद म्हणजे जागतिक राजकीय क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक महापर्वणीच होती असे विधान करावयास काही हरकत नाही .महाराष्ट्रातून फक्त कु.शिफा कासार हिची निवड झाली त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. संपूर्ण जगातून या परिषदेसाठी 3500 प्रतिनिधी सहभागी झाले होते
कु.शिफा हिने सादर केलेला रिसर्च पेपर या परिषदेकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कु.शिफा कासारने जेव्हा आपला रिसर्च पेपर परिषदेमध्ये सादर केला तेव्हा उपस्थित विविध देशातील संशोधकांनी तिचे खूप कौतुक व अभिनंदनही केले. शिफाही राष्ट्रीय राजकीय विश्लेषक असून ती संपूर्ण भारतात काम करते. तिची निवड झाल्यामुळे ही महाराष्ट्रासाठी व भारतासाठी ही खरोखरच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी कु.शिफाने दोन प्रबंध सादर केले होते. विशेष म्हणजे तिचे दोन्हीही प्रबंध या परिषदेसाठी निवडल्या गेले होते . आंतरराष्ट्रीय परिषदेने तिला दोन पैकी कोणताही एक पेपर सादर करण्यास सांगितले होते. त्यामुळे परिषदेच्या नियमानुसार तिने एक पेपर तिने आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला . एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये महाराष्ट्रीयन कन्येचे दोन्ही प्रबंध निवडल्या जाणे ही खूप मोठी अभिमानाची बाब आहे.
त्याबाबत कु. शिफा कासारचे मिशन आय ए एस व मित्र परिवारात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
कुमारी शिल्पा कासार ही मिशन आयएएसचे संचालक व जीएसटी चे माजी उपायुक्त श्री महेबूब कासार यांची कन्या असून तिने आपले शिक्षण सुप्रसिद्ध अशा अजीम प्रेमजी विद्यापीठातून पूर्ण केले आहे. भारतातील वेगवेगळ्या पक्षांसाठी तसेच वेगवेगळ्या राजकीय व्यक्तीसाठी राजकीय विश्लेषक म्हणून तिने काम केले आहे. तिच्या या निवडीबद्दल व दक्षिण कोरिया ला पेपर सादर करताना तिला मिळालेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मिशन आय ए एस. चे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
