हळवल फाटा येथे बीएमडब्ल्यू कारचा अपघात
कणकवली
तालुक्यातील हळवल फाटा येथे ओरोसहुन मुंबईच्या दिशेने जाणारी चार चाकी बीएमडब्ल्यू कार येथील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मुंबईहून ओरोसच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर येऊन पलटी झाली. या अपघातात चार चाकी बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे तर या कार मध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते. तिन्ही जणांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचा दर्शनी भागाचा आणि छताच्या भागाचा चकाचूर झाला होता. या घटनेची माहिती 112 आपत्कालीन क्रमांकावर प्राप्त होताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मनोज गुरव, कविता सावंत, किरण कदम, तसेच महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मार्गावरून कार बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते.
