You are currently viewing पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्याचे निर्देश

पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्याचे निर्देश

पात्र शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देण्याचे निर्देश

 सिंधुदुर्गनगरी

भारतीय कृषी विमा कंपनी यांनी हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना 2024-25 अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पिक विमा संदर्भात बैठक पार पडली. या  बैठकीमध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना व हवामान आधारित पुनर्रचित फळ पिक विमा योजना याबाबत चर्चा करण्यात आली.  यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटीलमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकरजिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवीजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री नाईकनवरेभारतीय कृषी विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक अतुल झनकरस्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे विनायक पाटीलकृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बडे उपस्थित होते.

या बैठकीत सुपारी या पिकाचा विमा शेतकऱ्यांना काढता यावा यासाठीचा प्रस्तावहवामान आधारित फळ पिक विमा योजना यामध्ये विविध निकष सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुधारित करून त्याचा प्रस्तावतसेच आंबा तसेच काजू लागवड शेतकऱ्यांचे पोट खराब क्षेत्र पिक विमामध्ये समाविष्ट करणेई पीक पाहणी ची अट शिथिल करणे इत्यादी बाबींसाठी देखील राज्यस्तरावर प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा