फोंडाघाटमध्ये मुसळधार पाऊस; नदी-नाले तुडुंब, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
फोंडाघाट
फोंडाघाट परिसरात रात्रभर ढगफुटी सदृश पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. “अनावश्यक प्रवास टाळा, शक्यतो घरीच थांबा,” असा संदेश प्रशासनाने दिला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनीही सरकारच्या सूचना पाळण्याचे आवाहन करत नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी दक्ष राहावे असे म्हटले आहे. रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहता वाहनचालकांनी विशेषतः सावध ड्रायव्हिंग करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या वर्षीचा पाऊस आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित पातळी ओलांडत आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन सुरक्षित राहावे. “आपले जीवन अमूल्य आहे, कृपया स्वतःची काळजी घ्या,” असे आवाहन अजित नाडकर्णी यांनी ‘संवाद मीडिया’मार्फत केले आहे.

