कणकवली :
कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात नव्याने स्थापित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन व कृष्णा डायग्नोस्टीक यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत सीटी स्कॅन मशीनचा लोकार्पण सोहळा राज्याचे मत्स्योदयोग आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंगळवार २२ जूलै रोजी सकाळी ०९.३० वाजता होणार आहे.
सदर कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विशाल रेड्डी यांनी केले आहे.

