You are currently viewing कुणा एकीचे लग्न मोडले

कुणा एकीचे लग्न मोडले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कुणा एकीचे लग्न मोडले*

 

वाण नाही पण गुण लागला

पोरानी धरला *जोडा हाती*

सेल्फी काढती मोबाईल समजून

उत्साहाला आली केवढी भरती

//1//

झाली पाॅप्युलर सेल्फी आता

पोरांना नाही तीने *सोडल*

सेल्फी घेऊन पोर *मोकळी*

थोरा मोठ्यांना तीने पछाडल

//2//

अशी काय ती आहे मोहीनी

भुरळ घालून सर्वाना *धरले*

सोडून हातातील “सर्व कामे”

सासू सुनेचे नाते *बिनसले*

//3//

नाही राहिले धरबंध कुणाला

सर्व लागले सेल्फी हाणायला

वाढू लागले *फॅड* सेल्फीचे

*सेल्फी* नावाचा रोग जडला

//4//

विकोपा जाऊन वेड सेल्फीचे

कित्येक पर्यटक दरीत पडले

आचरटपणाचा कळस होऊन

*कुणा एकीचे लग्न मोडले*

//5//

 

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा