You are currently viewing चिरेखाणीतील कामगाराच्या खुनप्रकरणी संशयित चुलत भावाला न्यायालयीन कोठडी

चिरेखाणीतील कामगाराच्या खुनप्रकरणी संशयित चुलत भावाला न्यायालयीन कोठडी

चिरेखाणीतील कामगाराच्या खुनप्रकरणी संशयित चुलत भावाला न्यायालयीन कोठडी

देवगड
देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडी परिसरातील चिरेखाणीत एका परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात संशयित असलेल्या मृताच्या चुलत भावास देवगड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मृत कामगाराचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव (वय २०, मूळ रा. मध्यप्रदेश) असून, त्याचा चुलत भाऊ रितीक दिनेश यादव (वय २०, मूळ रा. मध्यप्रदेश) याच्यावर खुनाचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वरेरी कुळये सडेवाडीनजीक असलेल्या शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेवरील उमेश गंगाराम गवाणकर यांच्या चिरेखाणीवर हे दोघे काम करत होते.

१६ जुलै रोजी पहाटे एका किरकोळ वादातून रितीक यादव याने कृष्णकुमार यादव याच्या डोक्यात ट्रकमधील व्हील पान्याने जोरदार प्रहार केला, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी ६ वाजता उघडकीस आली. चिरेखाणीचे मुकादम विजय शेंडगे यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीसांनी रितीक यादवला अटक करून त्याला २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले, आणि न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले.

या खून प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा