You are currently viewing सावली देतो तो विस्तारून

सावली देतो तो विस्तारून

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सावली देतो तो विस्तारून*

(662)

 

जन्म दात्री माझी *गुरू*

उपकार तिचे प्रथम स्मरू

बोल बोबडे होता सुरू

बाळ *चालते* तुरू तुरू

//1//

सावली मागे धावतो फार

वाटतो त्याला तिचा आधार

पळून पळून *दमून* जातो

पदरा आड *पितो धार*

//2//

बोल बोबडे प्रयत्न तोकडे

समज यायला लागतो वेळ

निरीक्षणातून सर्व शिकतो

म्हणून द्यायचा बाळा खेळ

//3//

गुरू आधाराची मिळता सावली

मनुष्य घेतो मोठी *झेप*

सोडून देतो आधार काठी

पाय मुरगळता लावतो लेप

//4//

निरीक्षण रूपी महा गुरू

प्रथम लागतो पुजायला

मिळतो आशीर्वाद जेव्हा त्याचा

सावली शिकतो *द्यायला*

//5//

वृक्षवल्लरीना *नसून गुरू*

उत्क्रांत होतात आधार घेऊन

आधार देतात मोठ्या तरूला

*सावली देतो तो विस्तारून*

//6//

विनायक जोशी 🖋️ठाणे

मीलनध्वनी/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा