You are currently viewing अंगण ! माझ्या मनातलं !!

अंगण ! माझ्या मनातलं !!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अंगण ! माझ्या मनातलं !!*

 

घर पूर्वीही …असायची

पुढे त्यांना अंगण असायचं

दारापुढे ठिपक्यांची कोरलेली रांगोळी

त्यात एक विचारमग्नं कासव रांगायचं

 

काही घर अशीही शेजारी

त्यांना …अंगण नसायचं

पण त्या घरांना काळजी नसायची

कारण त्यांना आमचं शेजार असायचं

 

सणाला !आमच्या सोबतचं ताग्यातून

शेजारची कपडे शिवली जायची

सारेजण माप द्यायला शिंप्याकडे

दंगामस्तीनं!जत्रा पोरांची निघायची …!

 

अंगण कुणाही जाती धर्माचं असो

रांगोळीतल्या कासवानं अंगण सोडलं नाही …..

घराची अंगण इतकी विशाल मनांची

कुणाच्याही घरात शिरा!लपा!कुणी कधी हटकलं नाही …………..!

 

अंगणात रांगोळी काढणारी आई

तुझी माझी अशी कुणाची नसायची

हा देश माझा!सारे बांधव माझे

ती आई! माझी भारतमाता असायची.!

 

अंगण माझ्या मनातलं….आजही

आहे कासवागत शांत विचारमग्न..

ठिपक्यांना जोडणारी आईची रांगोळी

सारवलेल्या अंगणात आहे संलग्न .!!!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा