*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सहज विनोद*
तू कुणाला काय द्यावे
हेच देवा मी वदावे
तोच माझा हर्ष आहे
मम शब्दा मान द्यावे ।। १।।
गर्दभा द्यावा गळा तू
कोकिळा द्यावीच सेवा
चंदनाला स्वर्ण पुष्पे
अन् सुवर्णा गंध द्यावा ।।२।।
राजर्षीला दीर्घ आयु
विद्वाना अन् धन द्यावे
ब्रह्मदेवा काय सांगू
इक्षुदण्डा फल द्यावे ।।३।।
उंची द्यावी त्या सशाला
आणि उंटा रुप द्यावे
धर्म द्यावा दुर्जनांना
सज्जनांना पद द्यावे ।।४।।
काय उलथापालथे
होईल मी ना जाणतो
मी तुझा अन् तूच माझा
फक्त विनोदे मागतो ।।५।।
किंतु देवा तूच आहे
सहस्त्राक्ष आणि शीर्ष
तू असावे अंतरंगी
हा असावा मज हर्ष ।।६।।
*©सर्वस्पर्शी*
©कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.
नाशिक ९८२३२१९५५०
