दिविजा वृद्धाश्रमात डोळ्यांपासून दातांपर्यंत आरोग्य शिबिरात तपासणी!
कणकवली
समाजातील वृद्ध आणि गरजूंसाठी कार्यरत असलेल्या दिविजा वृद्धाश्रमाने यावर्षीही सामाजिक बांधिलकी जोपासत एकापेक्षा एक आरोग्य शिबिरे यशस्वीपणे आयोजित केली. यामध्ये डोळ्यांची तपासणी, फिरते दंत चिकित्सा शिबिर, तसेच आयुर्वेदिक आरोग्य मार्गदर्शन शिबीर यांचा समावेश होता.
🔹 ४ जुलै: डोळे तपासणी शिबीर – समता फाउंडेशनच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात डॉ. मारुती सावंत व नितीश शेट्ये यांनी ६० वृद्धांची तपासणी केली. काही रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला.
🔹 ११ ते १३ जुलै: मोफत फिरते दंत शिबिर – डॉ. किसन व कृतीक गारगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात ३०० हून अधिक रुग्णांनी सहभाग घेतला.
७० रुग्णांचे दात काढण्यात आले
३० रुग्णांचे दात साफ
४० चे फिलिंग
३० चे एक्सरे
तसेच कवळी बसवण्याचीही सेवा पुरवण्यात आली.
🔹 १५ जुलै: सर्वांगीण आरोग्य मार्गदर्शन – डॉ. प्रणय मालंडकर, मनीष जवले आणि वैशाली शिंदे यांनी मधुमेह, रक्तदाब, हृदय, हाडे, त्वचा आणि वजन यासंदर्भात समर्पक मार्गदर्शन केले. उपस्थित आजी-आजोबांची मोफत तपासणी आणि जनरल चेकअपही करण्यात आला.
दिविजा वृद्धाश्रमाने राबवलेले हे उपक्रम वृद्धांसाठी केवळ आरोग्याची काळजी घेणारे नसून, त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण करणारे ठरले आहेत.

