You are currently viewing बांदा पोलिस रहिवासी चाळीच्या कामासाठी तिसऱ्यांदा उपोषण; बांधकामाला विलंबामुळे संतप्त प्रतिक्रिया

बांदा पोलिस रहिवासी चाळीच्या कामासाठी तिसऱ्यांदा उपोषण; बांधकामाला विलंबामुळे संतप्त प्रतिक्रिया

बांदा पोलिस रहिवासी चाळीच्या कामासाठी तिसऱ्यांदा उपोषण; बांधकामाला विलंबामुळे संतप्त प्रतिक्रिया

२२ जुलै रोजी सिंधुदुर्ग कलेक्टर कार्यालयासमोर उपोषण; जमीन अद्याप SP सिंधुदुर्ग यांच्या नावावर न झाल्याने कारवाईची मागणी

बांदा
बांदा येथील पोलिस रहिवासी चाळीचे बांधकाम गेली अनेक वर्षे रखडले असून, अद्याप प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. या विलंबाविरोधात सामाजिक कार्यकर्ते सीए साईप्रसाद मंगेश कल्याणकर यांनी मंगळवार, दिनांक २२ जुलै २०२५ रोजी तिसऱ्यांदा उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

हे उपोषण सकाळी १० वाजल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होणार आहे. श्री. कल्याणकर यांच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत संबंधित जमीन पोलीस अधीक्षक (SP), सिंधुदुर्ग यांच्या नावे करण्यात येत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे.

कल्याणकर यांनी याआधीही दोन वेळा या प्रश्नावर उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती झालेली नाही, यामुळे आता “आत्मक्लेश” स्वरूपात आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

——————————————-

*संवाद मीडिया*

*🌟 व्यावसायिक गाळे भाड्याने देण्यासाठी उपलब्ध – सावंतवाडी 🌟*

*🔹 गाळा क्र. 1*
▪️ एरिया: 300 स्क्वेअर फूट
▪️ स्थान: काॅसमाॅस पॅराडाईज, सावंतवाडी
▪️ ठिकाणाचे वर्णन: जेलच्या मागे, MRF शोरूमच्या शेजारी

*🔹 गाळा क्र. 2
▪️ एरिया: 168 स्क्वेअर फूट
▪️ स्थान: संचयनी पॅलेस, सावंतवाडी
▪️ ठिकाणाचे वर्णन: शिवसेना ऑफिसशेजारी

*✅ दोन्ही गाळे व्यवसायासाठी योग्य व मुख्य ठिकाणी स्थित*
*✅ स्वच्छ व सुसज्ज जागा*

*📞 संपर्कासाठी:*
*9021194984 / 9822150331*

*> लवकर संपर्क साधा – मर्यादित वेळेसाठी उपलब्ध!*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/178246/
———————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा