कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) पदी सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली तालुक्यातील कासार्डे गावचे सुपुत्र जयप्रकाश परब याची प्रशासकीय बदलीत नेमणूक करण्यात आली आहे.
या आधी त्यानी लांजा,देवगड व वैभवावाडी येथे गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यानतंर त्याची प्रशासकीय बढती होत भंडारा जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभागात) बदली झाली होती. यानतंर तेथील यशस्वी कार्यभार करून ते जिल्हात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाले आहेत. त्यांना जिल्हाच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती असल्याने जिल्हाच्या विकासात्मक कामात मदत होणार आहे.त्यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारल्यानंतर जयप्रकाश परब म्हणाले, सर्वांना विश्वासात घेऊन विभागातील अधिकारी,कर्मचारी व ग्रामपंचायतींच्या सहकायार्ने विकास कामांना गती देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून पालकमंत्री नितेश राणे यांना अपेक्षित असलेली विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
