*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्मा सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*समतोल*
तोल पेलताना कधी
गफलत होता साधी |
चंचलता ही मनाची
ढासळते तोल आधी ||१||
तोल सावरण्यासाठी
साथ अभ्यस्त मनाची |
चिंतन सावरल्याचे
शक्तीच अंतर्मनाची ||२||
वाट त्याची साथ त्याची
निवड असावी मला |
सुयोग्य निवडण्याचे
ज्ञान ते लाभावे मला ||३||
आस मला खास आहे
विश्व समतोल व्हावे |
तोल जर बिघडला
समतोली मी असावे ||४||
अनुभवी ज्ञानातून
योग्य कार्य करण्याचे |
निवड आणि कृतीला
स्वातंत्र्य दे पेलण्याचे ||५||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.- वेंगुर्ला
जि.- सिंधुदुर्ग, राज्य- महाराष्ट्र.

