*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मी आज पुन्हा*
खोटे होते ते प्रेम केले मी आज पुन्हा
खऱ्या प्रेमाला मुकलो मी आज पुन्हा
ती धोका देणार नाही खात्री होती
सोडून गेली एकटा पडलो मी आज पुन्हा
दगाबाजांच्या दुनियेत प्रेम शोधत होतो
प्रेमालाच लुटतांना पाहिले मीआज पुन्हा
हयात गेली दुःखे सावरण्यात माझी
सुखा पासून वंचित राहिलो मी आज पुन्हा
कोण भेटले कोण होते सोबतीला
एकटाच जळत चाललो मी आज पुन्हा
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.
