You are currently viewing अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत पणदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत पणदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

*🚩 अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत पणदूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न*

*🚩श्री सत्यवान रेडकर यांनी केले मार्गदर्शन*

कुडाळ

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग मार्फत शिवाजी इंग्लिश स्कुल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा येथे शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी श्री सत्यवान यशवंत रेडकर यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले.

कोकणातील प्रशासनात स्थानिक उमेदवारांचा टक्का वाढावा, शासकीय भर्त्या पाटीलशांची माहिती मिळावी, अभ्यास साहित्य कसे मिळवावे, दिल्ली, पुणे ना जाता या परीक्षांची गावात राहूनच कशी तयारी करावी, कुठली शाखा निवडल्यावर कुठल्या परीक्षा देता येतात, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, संकेतस्थळे, अभ्यासक्रम याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. युपीएससी , एमपीएससी, बँकिंग, सरळसेवा भरत्या स्टेनोग्राफर, न्यायालयीन पदांसाठी पात्रता काय ? तयार कशी करावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे प्रथम पुष्प वाहिले गेले महासंघ पुढील काळात जिल्हाभरात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम भविष्यात घेऊन जाणार असा संकल्प सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड यांनी या निमित्ताने केला.

सदर मार्गदर्शन वर्ग हा निशुल्क होता. ९ वी ते १२ वी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी यांनी या वर्गाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक श्री सत्यवान रेडकर, मराठा महासंघाचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष आशिष काष्टे , सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, दुर्गसंवर्धन व इतिहास संशोधन विंग जिल्हाध्यक्ष गणेश नाईक, शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय संस्थेचे सदस्य निलेश परब, प्रशाला शिक्षिका सलोनी सावंत मॅडम उपस्थित होत्या श्रीम तळेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आभार गणेश नाईक यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा