युथ फोरमच्या अध्यक्षपदी ऍड. सिद्धेश माणगांवकर यांची फेरनिवड
देवगड
युथ फोरम, देवगड या संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांची, तर सचिवपदी विनायक उर्फ अमित दीपक पारकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सन २०२५-२०३० या पंचवार्षिक कालावधीकरिता संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तसेच पाच वर्षांच्या कालावधीसाठी शहर कार्यकारिणीही स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी ओंकार सारंग यांची निवड करण्यात आली आहे. युथ फोरमचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
युथ फोरम, देवगड या संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या सभेत संस्थेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी प्रणव मधुकर नलावडे, खजिनदारपदी सागर विलास गांवकर, सहसचिवपदी रसिका अनिलकुमार सारंग, कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रथमेश अरविंद माणगांवकर यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच सहसचिवपदी ऋत्विक प्रल्हाद धुरी, विशेष निमंत्रित कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड. अपेक्षा सुनील सकपाळ, कार्यकारिणी सदस्य म्हणून आकाश सुनील सकपाळ, ॲड. श्रुती सिद्धेश माणगांवकर, प्रणव श्रीपाद पारकर, भूषण दातार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शहर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी जितेश मोहिते, सचिवपदी आज्ञा कोयंडे, सहसचिवपदी विनय पराडकर, सहसचिवपदी शुभम महाजन, कार्यकारिणी सदस्य म्हणून हर्षित कोयंडे, रुद्रा शेट्टे, राधा जगताप, श्रवण बांदेकर, श्रेयस कडू यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, युवा उद्योजक सनित आचरेकर, निनाद देशपांडे, परिमल नलावडे, जितेश जाधव यांनी अभिनंदन केले.
