*काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री योगिनी पैठणकर लिखित अप्रतिम लेख*
*”वारी आषाढी की आभासी*”?
*”जाता पंढरीसी सुख वाटे जीवा*” हा अभंग ऐकल्यानंतर आपलं मन आणि पावलं पंढरीकडे वळायला लागतात ..!दरवर्षी आपण आषाढी एकादशीला ही वारी बघतो ,चालतो ,अनुभवतो! संत मुक्ताबाई ,तुकाराम, यांच्या सगळ्यांच्या पालख्या” राम कृष्ण हरी” म्हणत निघतात, श्रद्धा आणि भक्ती यांचा मिलाफ म्हणजे ही वारी! सगळे सुखदुःख विसरुन ,जात धर्म विसरून, स्त्री पुरुष भेद विसरून, भक्ती मार्गाने हा भक्त आपल्या माऊलीच्या म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनास निघतो! साऱ्या महाराष्ट्रातले सर्व भाविक इथे एकत्र जमतात. आणि गुण्या गोविंदाने नांदतात. एक मोठी अध्यात्मिक शक्ती त्यांच्यासोबत कायम चालत असते ..अभंग ,भजनं, गाणे गात लोक सतत पायी चालत असतात.
खूप जण या वारकऱ्यांची सेवा करतात ,अन्नदान ,मेडिकल, पाय दाबणे, फूट मसाज ,पाणी वाटप ,फळं देणे ,राहण्याची सोय करणे ,प्रत्येक जण आपापल्या भक्ती भावाने जसे जमेल तसे करत असतात! बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे …म्हणत …पाऊले चालती पंढरीची वाट !वारी म्हणजे ज्ञानाचा सागर .!वारीत सारी जिवाभावाची माणसं एकत्र येतात.. अभंगातुन ज्ञान मिळते, एकमेकांची काळजी घेतले जाते ,यामुळे सुख, समाधान ,आनंद मिळतो ..वारी म्हणजे भक्तीचा प्रचंड उत्सव! जगभरासाठी एक अध्यात्मिक पर्वणी घेऊन ती येत असते.. पुंडलिक वरदा विठ्ठल… म्हणून सारे जण वारीत समाविष्ट होतात आणि लहान थोर या वारीमध्ये एकरूप होतात.
पण या गोष्टीची दुसरी ही बाजू आहे.. सध्या येणाऱ्या तरुण वर्गात किती बरं लोक खरे वारकरी होते ? किती जण श्रद्धेने या वारीस येतात ?हल्ली कुठलाही ग्रुप किंवा कुठलीही चार दोन पोरं– पोरी फबी,(. F b). किंवा इन्स्टा स्टोरीवर येण्यासाठी धडपडतात. नुसती youtube वाल्यांची जशी स्पर्धा असते..! छान स्वच्छ कपडे घालून गळ्यात मळा घालून, डोक्यावर गंध लावून, हा तरुण वर्ग फक्त फोटो करता,रील बनवण्यासाठी किंवा उगाचच इकडे तिकडे फिरण्यासाठी ,पांडुरंग– रुक्मिणीची मूर्ती , तूळशी वृंदावन डोक्यावर घेऊन पावसात चालताना दिसतात…मुली नववारी नेसुन नथ , बांगड्यांचा साज शृंगार करतात, त्यांचं रील संपत आणि वारी ही तिथेच संपते! हे कितपत योग्य आहे ??व्हाट्सअप स्टेटस, एफबी स्टोरी, यात फोटो व अभंगाचे व्हिडिओ लावणे म्हणजे थोडे ना वारी करणे.! तेथे पेशन्स लागतो, भक्ती , श्रद्धा लागते. या भौतीक गोष्टिंपासून लांब होण्याची मानसीक तयारी लागते. !
सुखासाठी करी तळमळी, पंढरीसी जाई एक वेळ! असं म्हणत तरुण वर्ग फक्त मोबाईल मध्ये कॅप्चर करण्यासाठी वारीला जातो, पण त्यांच्या मनात विठ्ठल खरंच आहे का? व ते जितके श्रद्धाळू ,तत्पर आहेत का की फक्त शेअर व लाईक मिळवण्यासाठी ते हे करतात? आपले दुःख बाजूला सारून आनंदासाठी करायची ती. वारी !पण हे लोक इतरांना दिसण्यासाठी आणि दाखवण्यासाठी ती करतात… अशी ही वारी संसारातील सर्व दुःख विसरुन आपण शोधतो, ती आनंदाची वारी पण प्रत्यक्षात हे मुलं उगाचच काहीतरी कुठेतरी फोटो टाकून स्टोरी बनवतात आणि त्यांचा ग्लॅमर करण्यासाठी धडपडतात व त्या लाईक -शेअर वर आनंदीत होतात..
शेवटी एकच.! तुमचा मोबाईलचा कॅमेरा बंद करून मेंदूचा –हृदयाच्या कॅमेरा उघडा ठेऊन तो विठ्ठल टिपा! रील बनवण्यापेक्षा रियल आयुष्यात तो माणसात अनुभवा! त्यांचा मान ठेवा! अभंग ,भारुड, चिपळ्यात तो जगा !दरवर्षी नाही जमले तरी एकदा तरी या वारीचा अनुभव घ्या !!हा निसर्ग पहा! पावसात भिजा! एकमेकांना मदत करा! त्या स्टोरी त तुम्हालाही अनंत लाईक येतील आणि अनेक लोक व आठवणी शेअर होतील! मग करायची नं यावर्षी हीआभासी दूनियेपासून लांब असलेली आषाढी वारी?
लेखन. – योगिनी व पैठणकर नाशिक.
