You are currently viewing आत्माराम

आत्माराम

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आत्माराम*

***********

विरघळती ही निष्पाप लोचने

तुझ्या भावभक्तीच्या सागरात

 

मन पामर भावुक भोळेभाबडे

सदैव अगतिक तुझ्या प्रतीक्षेत

 

तुझ्याविना दुजे सत्य रे कोणते

या साऱ्या अलौकीक त्रिखंडात

 

ऋणानुबंध आज साशंक झाले

निर्मळी , निष्पाप हरविली प्रीत

 

कलियुग साराच मोहमायाजाल

मीच शोधितो माझा आत्माराम

***********************

 

*©️वि.ग. सातपुते.*(भावकवी)*

📞 *9766544908*

प्रतिक्रिया व्यक्त करा