You are currently viewing शौर्य गाथा एका अदभूत योध्दयाची!!

शौर्य गाथा एका अदभूत योध्दयाची!!

🫡🇮🇳 *शौर्य गाथा एका अदभूत योध्दयाची!!*🇮🇳🫡

सावंतवाडी

*ऑपरेशन सिंधूर,ऑपरेशन पराक्रम, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक अशा विविध शौर्यगाथांचे साक्षीदार असलेले भारतीय सैन्यदलातील डिफेन्स युनिटचे प्रमुख जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावचे सुपुत्र सुभेदार मेजर श्री संजय सावंत यांचा रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीमार्फत भव्य सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी सुभेदार मेजर संजय सावंत यांनी सैन्यदलातील गेल्या 33 वर्षातील यशस्वी प्रवास वर्णन करताना कारगिल युद्ध, बालाकोट एअर स्ट्राईक, ऑपरेशन पराक्रम, ऑपरेशन सिंधूर ची शौर्य गाथा वर्णन करताना सर्वांच्याच अंगावर शहारे आले.राष्ट्रभक्ती हिच सर्वोच्च आहे जीवनात याचा प्रत्यय सुभेदार मेजर संजय यांचे व्यक्तिमत्त्वातून आला.खरचं या शूरवीर सैन्यदलातील नेतृत्वास लाख लाख सलाम* 🇮🇳🇮🇳🫡🫡🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🫡
*रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रो ॲड सिध्दार्थ भांबुरे, सचिव रो सिताराम तेली, खजिनदार रो आनंद रासम व टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच*. 👏👏👏👏👏👏👏👏
*सच्चा शूरवीराचा सन्मान आपण केलात तो आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. सुभेदार मेजर संजय सावंत यांची व्याख्याने महाविद्यालयस्तरावर होणे आवश्यक आहे.यासाठी रोटरी क्लब ने पुढाकार घ्यावा असे वाटते.युवा वर्गास देशभक्ती, राष्ट्रप्रेम व सैनिकाचे योगदान याचे महत्व समजने आवश्यक आहे.*
*या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले यासाठी पुनश्च एकदा रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन!!*👏👏🫡🫡👏👏🫡🫡👏👏

Rtn Sachin Madane
Assistant Governor
RID3170

प्रतिक्रिया व्यक्त करा