You are currently viewing सावंतवाडी लायन्स अध्यक्षपदी ॲड. अभिजीत पणदूरकर, सचिवपदी विजय चव्हाण

सावंतवाडी लायन्स अध्यक्षपदी ॲड. अभिजीत पणदूरकर, सचिवपदी विजय चव्हाण

सावंतवाडी लायन्स अध्यक्षपदी ॲड. अभिजीत पणदूरकर, सचिवपदी विजय चव्हाण

२० जुलैला शपथविधी सोहळा

सावंतवाडी

सावंतवाडी लायन्स क्लबच्या २०२५-२६ या कार्यकालासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी ॲड. अभिजीत पणदूरकर, सचिवपदी विजय चव्हाण तर खजिनदारपदी प्रकाश राऊळ यांची निवड झाली आहे.

या नव्या कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा शनिवार, २० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता गोविंद चित्र मंदिर, सावंतवाडी येथे उपप्रांतपाल डॉ. किरण खोराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी संदेश परब, महेश पाटील (द्वितीय) आणि जितेंद्र पंडित (तृतीय) यांची निवड झाली आहे. सहसचिव योगेश टकेकर, सहखजिनदार अनिता पाटील यांच्यासह टेमरपदी रोहित नाडकर्णी आणि ट्वेल ट्विस्टरपदी बाळासाहेब बोर्डेकर यांची नियुक्ती झाली आहे.

क्लबच्या विविध समित्यांमध्ये स्वच्छ भारत समितीत नीलम नाईक, स्वाती पै, मेघना राऊळ, लायन क्वेस्टसाठी अनुश्री पणदुरकर, सुजाता परब, पीआरओ म्हणून गजानन नाईक, मेंबरशिप चेअरमन – गंगाराम पै, जीएमटी – प्रसाद राऊत, जीएसटी – महेश कोरगावकर, युथ प्रोग्रॅम – प्रतीक चोडणकर, निखिल पाटील, रोहन परब यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

हेल्थ समितीत डॉ. गोविंद जाधव, श्लोका चोडणकर, स्वाती राऊत, ऍक्टिव्हिटी चेअरमन म्हणून रविकांत सावंत व राजन कुबडे, तर फंड रेझिंगसाठी दया परब आणि सुनील दळवी यांची निवड करण्यात आली आहे.

या शपथविधी कार्यक्रमाला सर्व लायन्स कुटुंबीय आणि लायन्स प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मावळते अध्यक्ष अमेय पै यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा