You are currently viewing दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि महिलांसाठी साड्यांचे वाटप

दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि महिलांसाठी साड्यांचे वाटप

दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि महिलांसाठी साड्यांचे वाटप

२३ जुलैला नॅब सावंतवाडीचा उपक्रम

सावंतवाडी
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) सावंतवाडी शाखेच्या वतीने दृष्टीबाधित सदस्यांच्या पाल्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप बुधवार, २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता भटवाडी येथील नॅब संस्थेच्या सभागृहात करण्यात येणार आहे.

या उपक्रमात शैक्षणिक साहित्याबरोबरच गरजू लाभार्थी महिला आणि लाभार्थ्यांच्या पत्नींसाठी साड्यांचेही वाटप करण्यात येणार आहे. प्रेमनाथ हजारे यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ नॅब संस्थेला साड्यांचे योगदान दिले असून, त्या गरजू महिलांना दिल्या जाणार आहेत.

साड्यांची गरज असलेल्या महिलांनी किंवा लाभार्थ्यांच्या पत्नींनी ९४२२४३४३०० किंवा ९४०५२३९५५५ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदवावे, असे आवाहन नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर आणि सचिव सोमनाथ जिगजीन्नी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा